Advertisement

मरता केव्हाही येतं,

मरता केव्हाही येतं

The Lord has given us new... | Quotes & Writings by Chandan Karan ...


मरता केव्हाही येतं, 

पण जगता आलं पाहिजे

सुख भोगता केव्हाही येतं, पण दुःख पचवता आलं पाहिजे.

रंग सावळा म्हणून काय झालं? कर्तृत्व उजाळता आलं पाहिजे.

आणि रंग गोरा असला म्हणून काय झालं, मनावरील काजळी काढता आली पाहिजे.

यशानं माणूस उंच जातो,

पाय जमिनीवर ठेवता आले पाहिजेत. 

मिळालेल्या यशात समाधान मानून 

आनंदी जीवन जगता आलं पाहिजे.

पापं काय कसही करता येतं पण पुण्य कमवता आलं पाहिजे.

ताठ काय कोणीही राहतं पण जरा झुकून वागता आलं पाहिजे. 

ठेच जीवनात लागतेच, सहन करता आली पाहिजे.

नंतर मलमपट्टी करून तिला पुन्हा चालता आलं पाहिजे. 

कशाला बळी न पडता, आनंदी होऊन जगता आलं पाहिजे.

जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल,

ती उणीव भरता आली पाहिजे. 

हसू आणि आसूंचा मिलाफ करून 

समाधानी राहता आलं पाहिजे.


Post a Comment

0 Comments