Advertisement

जागो ग्राहक जागो

*MSEB आॅफिस च्या बाहेर एकजण केळी विकत होता...*


*MSEB officer* : कशी दिलीत केळी ? 


*केळीवाला* : कशासाठी विकत घेताय साहेब ?


*MSEB officer* : म्हणजे ? ?.


*केळीवाला* : म्हणजे साहेब जर देवळात प्रसाद म्हणून घ्याल तर 10 रूपये डझन वृध्दाश्रमात देणार असाल तर 15 रूपये, मुलांना डब्यात देणार असाल तर 20 रूपये, घरी खाणार असाल तर 25 रूपये

अाणि पिकनिक ला घेऊन जाणार तर 30 रूपये..


*MSEB Officer* : हा काय मूर्खपणा आहे, केळीतर एकच आहे मग त्याचा भाव आसा का वेगवेगळा सांगतात  ??.


*केळीवाला* : ही तर तुमचीच पद्धत आहे पैसे वसुलीची.. 1 ते 100 रिडींग चा दर वेगळा, 100 ते 200 चा वेगळा, 200 ते 300 चा वेगळा..बापाची विज आहे का तुमच्या.

तुम्ही पण एकाच  खांबावरून वीज देता 

तरी घरासाठी,  वेगळा रेट दुकानासाठी वेगळा रेट

आणि कारखान्यासाठी वेगळा रेट आणि 

इंधन भार, विज गळती आणि हो आणखी एक साहेब, मीटर चे भाड़े,

मीटर काय अमेरिकेवरुन आयात केले की काय?

25 वर्षा पासून त्याचे भाड़े भरतो आहे, 

अशी त्याची किंमत आहेच किती ?

😡😡😬🤓😎


*जागो ग्राहक जागो*

🎺🎺🎺 

 *अ. भा. ग्राहक पंचायत.*


मिळाले तसे पुढे पाठवले

Post a Comment

0 Comments