Advertisement

*एका पालकाने विचारलेले प्रश्न ...*

 *एका पालकाने विचारलेले प्रश्न ...*

*15 जुन नंतर होणार शाळा सुरु..? खालील पैकी ऐका जरी प्रश्नाचे उत्तर देता आले तर नक्की शाळा सुरू करा...*

1) कोरोणावर खात्रीशिर औषध सापडले आहे का ?

2) लहान मुलांची रोग प्रतिकार क्षमता कमी नसते का ?

3) प्रत्येक बेंचवर ऐक विद्यार्धी बसवाल...पण सध्या ऐका बेंचवर तीन तीन विद्य़ार्धी दाटीवाटीने बसविले जातात..त्या पटसंख्येच्या मानाने..जास्त बेंच व खोल्या लागतील...त्या कशा उपलब्द करणार ?

4) शाळा भरताना व सुटल्यावर होणारी गर्दी कशी टाळणार ?

5) मधल्या सुट्टीत टाँयलेट मध्ये गर्दी होते त्याचे नियोजन काय ?

6) जिथे शहाणे माणसे ऐकत नाहीत...तीथे लहान मुले ऐकतील का ?

7) मोठ्या माणसांना त्रास झाला तर नेमके काय होतय सांगता येते...लहान मुले सांगु शकतील का ?

8) सर्व व्यवस्थित आहे हे दाखविन्या साठी या साठी शाळा सुरू करायच्या आहेत का ?

9) या तीन महिण्यात मुले जे नाही ते करत आहेत हे पालकांनी जवळुन पाहीलेले आहे...तरी ते शाळेत पाठवतील का ?

10) प्रत्येक मुलाकडे लक्ष देणे शिक्षकांना शक्य आहे का ?

11) पहिले काही दिवस नियम पाळले जातील पण नंतर दुर्लक्ष होणार नाही का ?

12) शाळेत संसर्ग झाला तर शालेय संस्था जबाबदारी स्विकारुन पुढील सहकार्य करतील का हात झटकुन जबाबदारी टाळतील ?

13) मुलांवर प्रयोग करण्यापेक्षा.. लोक सभा व विधान सभा चालु करुन कोरोणा संसर्ग वाढतो कि नाही हे पाहणे जास्त योग्य राजकीय टोलेबाजी नाही का ?

14) स्कुल बस..रिक्षावाले मुलांची ने आण करताना नियम पाळतील ?                     15)  उद्या शाळेत एखाद्या विद्यार्थ्यांला virus ची लागण झाली तर वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना quartine करावे लागेल. शिक्षकांना हि करावे लागेल.

16) quartine करीता आपल्या मुलाला /मुलीला एकटे सोडण्याची कुठल्या पालकांची तयारी होईल.            17) बहुतेक पालकांना अलीकडे एक किंवा 2 अपत्ये आहेत ,जर त्यांच्या मुलांना काही बरे वाईट झाले तर ते कोणाच्या आधारे जगणार ?

18) शिक्षण महत्त्वाचे की मुले? एक वर्ष मुलाने कमी अभ्यास केला किंवा नाही केला तर असे किती नुकसान होणार आहे? 

19) प्रयोग करुन पहायला मुले काय माकडे किंवा उंदीर आहेत का ?...

*यापैकी कोणाचे उत्तर हो म्हणुन आहे*...?


*याबाबत विचार अवश्य करा*........... 🙏 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻


Post a Comment

0 Comments