Advertisement

या सहा गोष्टी तुम्हाला नक्की Dipression म्हणजे नैराश्यापासून दूर ठेवतील

*या सहा गोष्टी तुम्हाला नक्की Dipression म्हणजे नैराश्यापासून दूर ठेवतील*




तुम्ही ज्या पॅनिक मनस्थितीतुन जात आहात, त्यातुन बाहेर पडुन सुखी आणि आनंदी जीवनाकडे वाटचाल करण्यासाठी काही साधे सोपे उपाय मी तुम्हाला नक्की सांगेन.


New findings could improve diagnosis, treatment of depression ...


*१. दणदणीत सुरुवात हाच दणदणीत विजय*


It was a professional win: Virat Kohli, following resounding ...


▪आपलं चुकतयं, हे आपल्याला कळणं, हेच यशाच्या वाटेवरचं पहिलं पाऊल असतं.

▪आपण फक्त सवयी बदलायच्या, आयुष्य आपोआप बदलतं,

▪निराशा, चिंता, भीती यामध्ये वेळ वाया घालवण्यासाठी, मौल्यवान वेळ फुकट घालवण्यासाठी आयुष्य स्वस्त नाही.

▪ह्या निराशादायक विचारांना कंटाळला असाल तर बाह्या झटकुन कामाला लागा.


*२. एक नवा जन्म घेण्यासाठी सज्ज व्हा*


Baby Checklist: 56 Baby Essentials


▪एक दिवस आधी, पुढच्या दिवसाचा पुर्ण कार्यक्रम आखायचा, अगदी बारीकसारीक प्लान करायचा, स्वतःला बिझी ठेवायचा, हा सर्वात हुकुमी उपाय असतो.

▪कामाचे आठ दहा तास सोडुन उरलेला प्रत्येक मिनीट, प्रत्येक तास प्लान करुन ठेवायचा. मी किती वाजता उठणार, कोणती पुस्तकं वाचणार? कोणते व्हिडीओज बघणार? हे ठरवुन टाकायचं.

▪असं शिस्तबद्ध आयुष्य जगल्याने भावनांचा कल्लोळ शांत होतो. मन फोकस्ड होतं.

▪अधुनमधुन उमाळे आलेच तर त्यांना सावरणं सोपं जातं.


*३. स्वप्न मोडली, तरी आपण मोडायचं नसतं*


165 Break Up Quotes To Motivate You To Move On (2020) | Him & Her


▪एखाद्या ध्येयासाठी पुन्हा पुन्हा झटुन प्रयत्न करणाराच आपली स्वप्नं पुर्ण करतो.

▪ह्या मार्गावर अपयशं आली म्हणुन तो सगळं सोडुन मुळुमुळु रडत बसत नाही आणि स्वतःवर रुसुन बसत नाही.

▪मनाला पुन्हा नव्या जोमाने कामाला लावायचं, जो स्वतःवर नियंत्रण ठेवतो, तो कधीच अपयशी होत नाही.

▪ध्यास नसला की उर्जा निर्माण होत नाही! उर्जा नसली तर असलं बेचव, अळणी जगणार कसं?


*४. स्वतःवर प्रेम करा*


Experts Explain 5 Powerful Ways to Love Yourself


▪तुम्हाला माहितीये, जो स्वतःवर प्रेम करत नाही तो माणुस सर्वात जास्त दुःखी असतो.

▪तुम्ही स्वतःला रोज प्रेमाने भेटता का?

▪तुम्ही स्वतःचे लाड करता का?

▪तुमच्यासारख्याच सेम टु सेम व्यक्तिमत्वाच्या माणसासोबत वेळ घालावायला तुम्हाला आवडलं असतं का?

▪तुमच्यासारख्या व्यक्तिमत्वाशी लग्न करायला आवडलं असतं का? प्रेम करायला आवडलं असतं का?

▪लोकांना रडके, दुःखी आणि निराशावादी लोकं अजिबात आवडत नाहीत,

▪स्वतःवर आणि इतरांवर प्रेम करणारे लोकं, अशा लोकांचा सहवास सर्वांना हवाहवासा वाटतो.

▪तुम्ही कोण बनावं, हा चॉईस तुमचा असतो.


*५. प्रत्येक अपयशाच्या पोटातुन यशाचा जन्म होतो*




▪तुमचं एका मुलीवर प्रेम होतं, तिला ते माहीतही नव्हतं, ती पुढे निघुन गेली, तुम्ही मात्र एका जागेवर खिळुन थांबलात.

▪अडकलेली कॅसेट, अडकलेलं गाणं इर्रीटेट करणार नाही तर काय करेल?

▪मुव्ह ऑन!

▪इतकंही काही वाईट झालेलं नाहीये. प्रत्येक शेवट हा नवीन सुरुवात आहे.

▪अगदी देवदास बनुन दुःखाचे उसासे सोडण्यापेक्षा पुन्हा नव्याने उत्साहाने स्वतःला सिद्ध करणं, निश्चितच जास्त सोपं आहे ना दादा!

▪जगासमोर स्वतःला आकर्षक स्वरुपात प्रेझेंट करा, इतकं आकर्षक की जग तुमच्या प्रेमात पडलं पाहिजे.


*६. सेवा करा*


serve - ETHOZ


▪आजुबाजुच्या जगाला आनंद वाटा, इतरांच्या चेहर्यावर स्मितहास्य फुलवाल तेव्हाच खरा तुमचा आत्मा तृप्त होईल.

▪लोकांना प्रश्ण सोडवण्यात मदत करा, आपोआप तुमचे प्रश्ण सुटु लागल्याचे अनुभव तुम्हाला येतील.

▪सकारात्मक विचार पसरवण्याचा वसा घ्या.

तन मन धनाने केलेली सेवा जिवंतपणी मोक्षाचा आनंद देतो.

▪मग खुश होण्यसाठी तुम्हाला कशाचीच गरज उरणार नाही, ना कुठल्या वस्तुची, ना कोणत्या व्यक्तीची गरज भासते.

▪सगळ्या जगाचा आनंद तुमच्या आतमध्ये सामावलेला आहे.

हा लेख वाचणार्‍यांना वेगवेगळ्या समस्या सतावत असतील,


तुमच्या सर्वांच्या समस्या वेगवेगळ्या असतील, पण सर्वांवर उत्तर मात्र सेम आहे.


व्यायाम, ध्यान, ध्येय, प्रेम आणि सेवा ह्याच पाच गोष्टी ह्याच तुमच्या प्रत्येकाच्या प्रत्येक प्रश्नावर उत्तर आहेत.

*तुमची सारी स्वप्ने पुर्ण होण्यासाठी सर्वांना मनःपुर्वक शुभेच्छा!!*


"आरोग्यम् धनसंपदा "

Post a Comment

0 Comments