Advertisement

दोन शब्द ( two words)

कुणी लिहिले माहित नाही पण छान लिहिले एकदा अवश्य वाचुन पहा "शब्द" बदलला की "अर्थ" बदलतो...😂 गरिब माणुस *दारु* पितो. मध्यमवर्गीय *मद्यपान* करतो.. तर, श्रीमंत लोक *Drink's* घेतात... काम केल्यावर गरिबाला *मजुरी* मिळते. काम केल्यावर मध्यमवर्गीयाला *पगार* मिळतो..तर, काम केल्यावर आफिसरला *Salary* मिळते... गरिब करतो ते *लफडं*. मध्यमवर्गीय करतो ते *प्रेम*.. तर, श्रीमंत करतो ते *Affair*... शब्दाबरोबर शब्द मांडला की *कविता* होते शब्दाने शब्द वाढला की *भांडण* होते.. शब्दाने शब्द वाढत गेला की लेखकाची *Royalty* वाढते... पैशाने गरिब असलात तरी चालेल पण , मनाने श्रीमंत रहा कारण गरिबाच्या घरावर लिहीलेलं असतं *" सुस्वागतम् " !* आणि, श्रीमंताच्या घराबाहेर लिहीलेलं असतं *" कुत्र्यापासून सावधान " !!* आयुष्य आईसक्रीम सारखं आहे, *"Test"* केलं तरी वितळतं आणि, *"West"* केलं तरी वितळतं.. *काही राहिलं तर नाही ना !!!* 🌀*जीवनामध्ये तुम्ही खूप काही मिळवलं असलं तरी आयुष्याच्या प्रत्येक *टप्प्यावर पुढे जात असताना नेहमी हा प्रश्न सर्वांनाच पडतो...* *"काही राहिलं तर नाही ना?”* 🌀*वर्षभराच्या पोराला बाईच्या हवाली टाकून जॉबसाठी जाण्याऱ्या आईला ती बाई जेव्हा विचारते* *"पर्स, चावी घेतली ना, काही राहिलं तर नाही ना?”* *ती आई कशी सांगेल कि ज्याच्या भविष्यासाठी एवढा आटापिटा चालू आहे तोच तर राहिला !!!* 🌀*खूप आशेने आईबापाने पोराला शिकविले. पोरगा परदेशात सेटल झाला. नातू जन्मला म्हणून आजी आजोबा टूरिस्ट विसावर गेले. ३ महिने झाल्यावर निघताना पोरगा सहजच बोलून गेला* *"सगळ चेक करून घ्या, काही राहिलं तर नाही ना?”* *काय उत्तर द्यावे त्या म्हातार्यांना कळेना कारण “आता मागे राहायला शिल्लक तरी काय आहे”* 🌀*लग्न होऊन पोरगी वरातीसोबत निघून गेली तेव्हा बापाला आत्या विचारते* *“दादा, पोरगी काही विसरली नाही ना रे, काही राहिलं तर नाही ना?”* *भूतकाळात गेलेल्या त्या बापाला पोरीच्या रूम मध्ये सुकलेली फुले दिसतात.* *अश्रू लपवत लपवत बाप बोलला “ती गेली पण आठवणी इथेच राहिल्या, दुसरे काय राहणार”* 🌀*६० वर्षे वय झाल्यावर आज साहेबाचा ऑफिसमध्ये शेवटचा दिवस होता. चपरासी बोलला* *"साहेब, काही राहिलं तर नाही ना?”* *साहेबानी डोळे बंद केले तर लक्षात* *आले कि पूर्ण आयुष्य या* *जागी काम करण्यात केले. सगळ्च* *इथे आहे मग “मागे काय राहणार”* 🌀*स्मशानात आईच्या चितेला अग्नी देऊन बाहेर पडलेल्या पोराला मित्र विचारतो* *“मित्रा, काही राहिलं तर नाही ना?”* *तो धावत धावत परत अग्नीजवळ गेला. आईचा चेहरा पाहण्यासाठी केलेला प्रयत्न अयशस्वी झाला.* *त्याला उमजेना कि काय राहून गेले. डोळे पुसत पुसत तो म्हणाला “काही नाही रे, जे राहिले ते आता सदा स्मरणात राहील”* 🌀*एकदा तरी वेळ काढून मागे बघा. जुन्या आठवणी ताज्या करा. डोळे भरून येईल. मन प्रफुल्लित होईल आणि आत्ताचा हा क्षण जगण्याची नवी उमेद मिळेल. मग कधीही काहीच मागे राहणार नाही. 🙏🏻🙏🏻


Post a Comment

0 Comments